प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- : कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते श्री.अरुण जमादार यांचा आदर्श समाजभूषण प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.प्रेस मिडीया लाईव्ह यांच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून डॉ.पी.ए.इनामदार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या उपस्थितीत आणि राष्ट्रीय पुरस्काराचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी माजी आमदार मोहन जोशी,प्रेस मिडीयाचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांच्या उपस्थितीत अरुण जमादार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यानी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाजसेवा मोलाची भर घालणारी आहे.एकता आणि एऐक्य जोपासण्याची परंपरा आपल्या कार्यक्षेत्रात रुजवून राज्य घटनेची समता आणि बंधुता ही तत्वे प्रमाणभूत मानून सामाजिक आणि धडाडीने सामाजिक सेवा करण्याची तळमळ या गुणांचा निष्ठावान जागरुक नागरिक म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.यावेळी प्रेस मिडीया लाईव्हचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान तसेच प्रेस मिडीयाचा सर्व स्टाफ आणि प्रेस मिडीया लाईव्हचे कोल्हापूर रिपोर्टर मुरलीधर कांबळे उपस्थित होते.