विद्या प्रसारिणी सभा चौक संचलित, प्राथमिक विद्यामंदिर व शिशूमंदिर चौक
प्रेस मीडिया लाईव्ह :
दिनेश रमेश महाडिक :
भारतीय संस्कृतीत प्रमुख सणांमध्ये रक्षाबंधन हा सण भाऊ व बहिणींचा स्नेह व उत्सवाचे पर्व साजरा करणारा दिवस म्हणून ओळखला जातो.... आपली संस्कृती जपणे हे आपले महान कार्य आहे... गुरुवार दि.३१/८/२०२३ रोजी रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या संपन्न झाला
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या कार्याध्यक्षा व प्राथमिक विद्यामंदिरच्या अध्यक्षा सौ. शोभाताई देशमुख, संस्थेचे उपकार्याध्यक्ष मा. श्री नरेंद्र भाई शहा, संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री योगेंद्र भाई शहा, शाळेचे समन्वयक मा.श्री देवानंद कांबळे सर,संस्थेच्या संचालिका व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलभा मॅडम उपस्थित होते..
कार्यक्रमाचे सुरुवात सर्व विद्यार्थ्यांनी *हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही प्रार्थना बोलून केली* ... कार्यक्रमाच्या स्वागताची सूचना सुलभा मॅडम यांनी केली... कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्री.देवानंद कांबळे सर यांनी केले.या प्रास्ताविकामध्ये सरांनी सांगितले समाजापर्यंत एक चांगला संदेश पोहचावा.यासाठी काल आपण एक छान असा उपक्रम राबवला.याचा लोकांपर्यंत एक चांगला संदेश गेला....
आपल्या शाळेतील शिक्षिका सौ.प्रगती खंडागळे मॅडम यांनी रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा या सणांची माहिती व महत्त्व काय आहे हे सांगितले. तसेच प्रगती मॅडमनी रक्षाबंधनाचा पौराणिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन गोष्टी रुपातून तसेच साध्या व सोप्या पद्धतीने मुलांना समजावून सांगितला..
एक विद्यार्थिनी व एक विद्यार्थी यांनी समोर येऊन प्रातिनिधिक स्वरूपात राखी बांधली व बहिणीला भेटवस्तू दिली. इतर मुलींनी ही मुलांना राख्या बांधल्या व भेटवस्तू देण्यात आले.
संस्थेचे उपकार्याध्यक्ष मा. श्री नरेंद्रभाई शहा यांनी मुलांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या...
आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, संस्थेच्या कार्याध्यक्षा, प्राथमिक विद्यामंदिर व शिशूमंदिरच्या अध्यक्षा मा. सौ शोभाताई देशमुख यांनी मुलांना आपण रक्षाबंधन दरवर्षी आपल्या शाळेत का साजरी करतो, हे सांगताना त्या म्हणाल्या याने मुलांवर चांगले संस्कार होत असतात आणि त्याची चांगली सवय मुलांच्या घरच्यांना देखील लागत असते. आपल्या पूर्वजांनी जे सण उत्सव सुरु केले त्यामागे प्रत्येक सणांमध्ये पौराणिक आणि वैज्ञानिक कारण दडलेले आहे. सणाच्या दिवशी नारळी भात केला जातो. समुद्र हा देव आहे त्याची पूजा केली जाते. याविषयी वर्णन केले.
पुढे त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या. आपल्या शाळेचा पट हा वाढत आहे. त्यासोबत अडचणी देखील वाढत आहेत.परंतू आपल्या सर्वांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते.... त्या ऊर्जेचा आपल्याला उपयोग करायचा आहे आणि पुढे जायचे आहे.काम करताना आपल्याला कोणी शाब्बासकी देवो अगर न देवो... कोणी स्तुती करो अगर न करो आपलं काम आपण करत राहायचं....
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रीना मॅडम यांनी छान पद्धतीने केले.. कार्यक्रमाची सांगता कु.पद्मजा मॅडम यांनी आभार प्रदर्शनाने केली.
अशाप्रकारे रक्षाबंधन हा कार्यक्रम आपल्या शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....