प्रेस मीडिया लाईव्ह :
दिनेश रमेश महाडिक : खालापूर प्रतिनिधी
शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने,शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री सन्माननीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना नेते,युवासेनाप्रमुख ,आमदार सन्माननीय श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने आणि शिवसेना सचिव, खासदार, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष सन्माननीय श्री.अनिलभाऊ देसाई साहेब यांच्या अध्यक्षतेखाली,कक्ष उपाध्यक्ष सन्माननीय राजूजी पाटील व सिरचिटणीस सन्माननीय विजयजी मालणकर यांच्या मार्गदर्शना नुसार, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष रायगड जिल्ह्यातील कर्जत ,खालापूर व सुधागड पाली तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आज संपन्न झाली.
कक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य सन्माननीय श्री ऐहतेशामजी पेनवाला साहेब यांचे विशेष मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना मिळाले.सदर बैठकीत नवीन पद नियुक्ती बाबत चर्चा, स्थानिक प्रश्न,बँकेच्या ग्राहकांना सेवा क्षेत्रात होणाऱ्या समस्या,ऑनलाईन फ्रॉडचे वाढत चाललेले प्रमाण कसे थांबवता येईल इत्यादी विषयांवर चर्चा झाली व बैठक संपन्न झाली.तसेच कर्जत शहरातील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी तसेच महाराष्ट्र शिव कामगार सेनेचे राज्य कार्यालय प्रमुख श्री समीरजी मुलानी यांनी सन्माननीय श्री ऐहतेशाम भाई पेनवाला साहेबांची सदिच्छा भेट घेतली या प्रसंगी जिल्हा संघटक श्री चैतन्य मळेवाडकर,जिल्हा कार्यालय चिटणीस श्री इलियासजी कर्जतवाला,उपजिल्हा संघटक श्री प्रदीपजी देशमुख,श्री अरुणजी गायकवाड,तालुका संघटक श्री दिनेशजी महाडिक,सहसंघटक श्री दत्ताजी देसाई,उपतालुका संघटक श्री अक्षयजी देशमुख,शहर संघटक शाहिदजी शेख,श्री साजिदजी नथानी आणि कर्जत,खालापूर,खोपोली,नेरळ, येथील सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते.