'
प्रेस मीडिया लाईव्ह :
जयसिंगपूर/प्रतिनिधी:
श्रद्धेय बाळासाहेबांचे विचार समाजातील उपेक्षित व दुर्लक्षित घटकाला आत्मसन्मान व प्रतिष्ठा मिळवून देणारे आहेत. त्यांचे विचार वडर समाजासह भटक्या जाती, जमातीतील लोकांच्या पर्यंत पोचविण्याचा निर्धार वडर समाजाच्या जयसिंगपूर येथील बैठकीत करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडी ही दलित, आदिवासी, भटक्या जाती जमातीसह समाजातील दुर्लक्षित व उपेक्षित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणारी पक्ष संघटना आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेते, श्रदेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर हे या घटकांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा आत्मसन्मान करीत आहेत. त्यांना बळ देणे व त्यांचे क्रांतिकारी विचार सर्व सामान्यांच्या घराघरापर्यंत पोचविण्याचा निर्धारही या वडर समाजाच्या बैठकीत करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडी जयसिंगपूर शहर कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा परिचय व पक्ष संघटन बांधणी बाबतची दिशा ठरवण्यासाठी जयसिंगपूर शहर कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद वडर होते.
यावेळी बोलताना प्रल्हाद वडर म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत. पण येथील दलित, आदिवासी, भटक्या जाती व विमुक्त जमातीतील लोकांचे प्रश्न आहे तसेच आहेत. त्यांना स्वातंत्र्य मिळाले पण त्यांचे प्रश्न व समस्या सुटलेल्या नाहीत. त्यांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी " वंचिता " साठी चालवलेल्या चळवळी मध्ये स्वतःला झोकून दिले पाहिजे. यासाठी युवकांनी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले.
वंचित बहुजन आघाडी जयसिंगपूर शहराचे अध्यक्ष नितीन साळुंखे व शहर उपाध्यक्ष युवराज नलवडे यांनी सर्वांचे स्वागत केले. तर आभार अक्षय भोसले यांनी मानले.
या वेळी जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी रामा अर्जुन, अविनाश भोसले, आकाश चौगले, बालाजी पोवार, अविनाश कलगुटगी, सागर भोसले, पावन बागडी, संजय वडर आदी उपस्थित होते.
विलास कांबळे जिल्हाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी ( उ ) कोल्हापूर.
संजय सुतार प्रसिध्दी प्रमुख
वंचित बहुजन आघाडी ( उ ) कोल्हापूर.