प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे
'आझादी का अमृत महोत्सव या अभियाना अंतर्गत 'मेरी मिट्टी मेरा देश' अर्थात 'माझी माती माझा देश' हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करणेत येत आहे.या उपक्रमाच्या अनुषंगाने शासन निर्देशा नुसार इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज महानगरपालिका मुख्य प्रशासकीय कार्यालयाच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे तसेच उपायुक्त तैमूर मुलाणी, मुल्य निर्धारक कर संकलन अधिकारी सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचप्रण (शपथ) घेणेचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी सहा. आयुक्त केतन गुजर, प्राथमिक शिक्षण प्रशासन अधिकारी अभयकुमार बिरनगे, कामगार अधिकारी विजय राजापुरे, लेखाधिकारी कलावती मिसाळ, लेखापरीक्षक दिलीप हराळे, शहर अभियंता संजय बागडे,जल अभियंता सुभाष देशपांडे, मुख्याध्यापक शंकर पोवार यांचेसह महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख,अधिकारी कर्मचारी आणि बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.