प्रबोधन वाचनालयात क्रंतिदिनी पंचप्राण शपथ



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.९, भारताच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त  ' माझी माती, माझा देश ' हे अभियान सर्वत्र राबवले जात आहे. त्यानिमित्ताने समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयात महाराष्ट्र शासन ,ग्रंथालय संचालनालय (मुंबई )आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय (कोल्हापूर )यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ ऑगस्ट या क्रांतीदिनी पंचप्राण शपथ घेण्यात आली.

 १) भारताला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करू. २)गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू.३) देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू. ४)भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्या प्रति सन्मान बाळगू .५)देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू. अशी ही पंचप्राण शपथ सामुहिक रित्या घेण्यात आली. तसेच यावेळी स्वातंत्र्य आंदोलन, क्रांतीदिन या संदर्भातील ग्रंथांचे, तसेच स्वातंत्र्य आंदोलनातील नेत्यांच्या चरित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. ही सामूहिक शपथ प्रसाद कुलकर्णी यांनी सर्वांना दिली. यावेळी सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी,अश्विनी कोळी ,देवेंद्र गायकवाड, धोंडीराम शिंगारे, दिनेश माने अभिषेक लाटणे ,अक्षय धोत्रे ,नारायण दोडे आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post