आजादी का अमृत ' महोत्सव अंतर्गत 'मेरी मिट्टी मेरा देश' अभियान २०२३ अभियान इचलकरंजी शहरात मोठ्या उत्साहात राबविणेत येणार :- आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे



प्रेस मीडिया लाईव्ह :

    इचलकरंजी : 'आझादी का अमृत ' महोत्सव उपक्रमाच्या अंतर्गत  शासन निर्देशानुसार इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरात 'मेरी माटी मेरा देश' अर्थात माझी माती माझा देश हे अभियान मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांद्वारे राबविणेत येणार आहे.

      


  आपल्या माती विषयी जनजागृती, साक्षरता आणि प्रेम निर्माण व्हावे या उद्देशाने दि.९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत  विविध उपक्रमांचे आयोजन महानगरपालिका प्रशासनाकडून करणेत येणार आहे. या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी आज मंगळवार दि.८ ऑगस्ट रोजी

बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीसाठी आमदार मा.प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी केले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार  प्रकाश आवाडे यांनी मागील वर्षी हर घर तिरंगा या उपक्रमातर्गत ज्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा या कार्यक्रमासाठी जे काही सहकार्य लागेल ते करणेची ग्वाही देऊन इचलकरंजी शहरवासीयांनी जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले. शिवसेना शहर प्रमुख भाऊसाहेब आवळे यांनी सुद्धा शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

  

१) *शिलाफलक* - 

      शिलाफलक या उपक्रमाच्या अनुषंगाने शासना निर्देशानुसार दि.१४ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० शिलाफलक अनावरण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

२) *ध्वजारोहण* -

  दि.१४ ऑगस्ट रोजी  सकाळी ९.५० वाजता  ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी शहरातील स्वातंत्र्य सैनिक, निवृत्त सैन्य तसेच पोलीस अधिकारी माजी सैनिक यांना आमंत्रित करणेत येणार आहे.

३) *पंचप्रण (शपथ)* -

 अंतर्गत बुधवार दि.९ ऑगस्ट रोजी महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात सकाळी १० वाजता महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांचेकडुन शपथ घेणेचा कार्यक्रम आयोजित करणेत आलेला आहे. 

*तसेच उद्या बुधवार दि.९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शहरातील सर्व नागरिकांनी हातामध्ये मातीचा दिवा घेऊन अथवा मुठभर माती घेऊन शपथ घ्यावी आणि त्याची सेल्फी घेऊन https://merimaatimeradesh.gov.in/   संकेतस्थळावर अपलोड करावी असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या कडून करणेत येत आहे.*

 ४) स्वातंत्र्य सैनिक आणि वीरांना वंदन -

        स्वातंत्र्य सैनिक आणि वीरांना वंदन या उपक्रमा अंतर्गत दि.१४ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता  इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि सुरक्षेसाठी बलिदान दिले आहे त्यांच्या वारसांचे तसेच स्वातंत्र्य सैनिक, सैन्य दलातील, पोलीस दलातील निवृत्त अधिकारी, माजी सैनिकांचा अथवा त्यांच्या परिवारातील सदस्यांचा यथोचित सन्मान करणेत येणार आहे.

(दि.१४ ऑगस्ट रोजीचे सर्व कार्यक्रम राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल येथे आयोजित करणेत येणार आहेत.)

५) *वसुधा वंदन* -

      दि.१४ ऑगस्ट रोजी शहीद भगतसिंग उद्या येथे ७५ देशी प्रजातीच्या रोपांचे वृक्षारोपण करुन अमृत वाटिका तयार करणेत येणार आहे.

६) *माती कलश* -

   शासन सुचनेस अनुसरून शहरातील प्रत्येक प्रभागामधुन माती संकलित करून आपल्या इचलकरंजी शहराचे नाव लिहून मा. जिल्हाधिकारी यांचे मार्फत राजधानी दिल्ली येथे पाठविण्यात येणार आहे.  

७) हर हर तिरंगा

      दि.१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच सर्व शहरवासीयांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावयाचा आहे.

    

  आझादी का अमृत महोत्सव या अनुषंगाने मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान संपूर्ण देशात राबविणेत येणार असुन आपल्या इचलकरंजी शहरात सुद्धा विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्य सैनिक, सैन्य दलातील निवृत्त अधिकारी कर्मचारी, शाळा- महाविद्यालयाचे शिक्षक विद्यार्थ्यी, स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळ सदस्य, सर्व नागरिकांनी  सहभागी होवुन हा उपक्रम यशस्वीपणे साजरा करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे  असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या कडून करणेत येत आहे.

     या बैठकीस उपायुक्त डॉ प्रदीप ठेंगल, सोमनाथ आढाव, अभयकुमार बिरनगे, कामगार अधिकारी विजय राजापुरे तसेच शहरातील स्वयंसेवी संस्था, शासकीय विभागांचे अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, बचत गटांचे प्रतिनिधी, पत्रकार यांचेसह महानगर पालिकेचे विभाग प्रमुख आणि नागरिक उपस्थित होते.

            पंचप्रण (शपथ)

▪️ भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करु

▪️ गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करु

▪️ देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करु

▪️भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगु.

▪️देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू.



          

Post a Comment

Previous Post Next Post