पाणी प्रश्नावर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर



प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी  : इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने सुळकुड योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती देण्यासाठी, सर्व नागरिकांना ही माहिती कशी द्यावी व त्यांचे शंका - समाधान कसे करावे या हेतूने ' कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर ' आयोजित केले आहे.

 हे शिबिर गुरुवार ता.१० ऑगस्ट सायंकाळी ५ ते ७ यावेळेस समाजवादी प्रबोधिनीत होणार आहे. तरी या शिबिरात जनतेशी संवाद साधू शकणाऱ्या इचलकरंजीतील सर्व राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन ' सुळकूड पाणी योजना - झालीच पाहिजे 'हे ब्रिद घेऊन कार्यरत असलेल्या सर्व राजकीय पक्ष, समाजसेवी संघटना, महिला ,कामगार ,यंत्रमागधारक व अन्य सर्व संघटना व सर्व इचलकरंजीकर नागरिक बंधु भगिनी यांच्या इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post