भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण समारंभ आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या शुभहस्ते राजाराम स्टेडियम येथे साजरा करणेत येणार


प्रेस मीडिया लाईव्ह :

   इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने  भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण समारंभ आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या शुभहस्ते राजाराम स्टेडियम  येथे साजरा करणेत येणार

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने 'मेरी मिट्टी मेरा देश' अर्थात 'माझी माती माझा देश' या उपक्रमातंर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करणेत आलेले आहे. 


  याच अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून मंगळवार दि.१५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९ .४५  वाजता भारतीय  स्वातंत्र्य दिनानिमित्त  होणारा महानगरपालिकेचा मुख्य ध्वजारोहण समारंभ आयुक्त तथा प्रशासक  ओमप्रकाश दिवटे यांच्या शुभहस्ते   राजाराम स्टेडियमवर शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करणेत येणार आहे. 

    महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा, राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल तसेच शहरातील विविध खाजगी माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांच्या एन. सी. सी. एम.सी.सी. विद्यार्थ्यांच्या सहभागातून राजाराम स्टेडियमवर   कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 

   तरी महानगरपालिकेच्या या मुख्य ध्वजारोहण समारंभा साठी शहर वासियांनी राजाराम स्टेडियमवर मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महानगरपालिके कडून करणेत येत आहे.


             

Post a Comment

Previous Post Next Post