प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी
येथील अनुभव शिक्षा केंद्र व ताराबाई गर्ल्स ज्युनिअर कॉलेज, शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लिंग आधारित समानता ह्या विषयावरील संवादसत्र संपन्न झाले.
या कार्यक्रमाची सुरुवात अनुभव शिक्षा केंद्राचे प्रशिक्षण प्रमुख साथी रोहित दळवी यांनी अनुभव शिक्षा केंद्राबद्दल सविस्तर माहिती देऊन केली. त्यानंतर अनुभवच्या सचिव साथी वैभवी आढाव यांनी विवेकाचे गाणे गावून उद्घाटन केले.संवादक स्नेहल माळी यांनी विद्यार्थिनींसोबत संवादात्मक चर्चासत्र पार पाडताना लिंग आधारित समानता ही संकल्पना विषद केली.
या कार्यक्रमाची सांगता अनुभव शिक्षा केंद्र इचलकरंजीचे कार्याध्यक्ष साथी अमित कोवे यांच्या मनोगताने झाली.
ह्या कार्यक्रमासाठी अनुभव शिक्षा केंद्र इचलकरंजीच्या कार्यवाह साथी नम्रता कांबळे,सांस्कृतिक प्रमुख दामोदर कोळी, सहसचिव उर्मिला कांबळे, अमोल पाटील, दिग्विजय चौगुले शिक्षक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.