' उडान ' शॉपिंग फेस्टिवल मध्ये महानगरपालिके कडून वतीने लावणेत आलेल्या स्टॉल भेटीप्रसंगी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचे आवाहन
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी यांनी सकाळ माध्यम समूहाच्या सहकार्याने शहरातील अग्रसेन भवन येथे उडान शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेले स्वच्छ सर्वेक्षण अभियान,माझी वसुंधरा अभियान असे विविध उपक्रम, महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येत असलेल्या सोयी सुविधा यांची माहिती शहरातील नागरिकांना मिळावी तसेच राष्ट्रीय स्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत नागरिकांची मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी उडान शॉपिंग फेस्टिवल मध्ये इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने एक स्टॉल लावणेचा नाविन्यपूर्ण निर्णय घेतला.
या अनुषंगाने सदर फेस्टिवल मध्ये जनजागृतीसाठी स्टॉल लावण्यात आलेला आहे.याठिकाणी एल.सी.डी. स्क्रीनवर महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांची तसेच सोयी सुविधांची माहिती प्रसारित करण्यात येत आहे. तसेच या स्टॉलच्या माध्यमांतून एन.यु.एल.एम. अंतर्गत महिला बचत गटांना त्यांच्या कापडी पिशव्यांच्या विक्रीसाठी दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सदर स्टॉलला आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी सपत्नीक सदिच्छा भेट देऊन पाहणी केली आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लॅस्टिकचा वापर बंद करून दैनंदिन जीवनात कापडी पिशव्यांचा वापर करणेचे आवाहन उपस्थित नागरिकांंशी संवाद साधताना केले.
यापुढेही महानगरपालिकेच्या वतीने अशाच प्रकारे विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणेत येणार असल्याचा मानस आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.