प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य व कामगार चळवळीतील योगदान हे उल्लेखनीय आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन केन्द्र सरकारने त्यांना भारतरत्न किताब देऊन गौरविण्यात यावे असे मत स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुल्ला यांनी व्यक्त केले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीच्या निमित्ताने पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने सामाजिक जागृती परिषद व आदर्श यंत्रमाग कामगार सन्मान सोहळ्याचे आयोजन इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनी हॉल येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले होते .
फिरोज मुल्ला सर पुढे म्हणाले इचलकरंजी शहरातील यंत्रमाग कामगारांच्या घरकुलाचा प्रश्न , त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचे प्रश्न, ज्येष्ठ यंत्रमाग कामगारांचे पेन्शन योजनाया सर्व समस्या करिता पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना शासन दरबारी कामगारांच्या बाजूने लढेल वस्त्रोद्योग मधल्या सर्व कामगारांनी एकजूट करून पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती कामगार सेनेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असेही आवाहन ही त्यांनी केले .
यावेळी इचलकरंजी शहरातील कॉम्रेड युवराज साठे, तूकाराम बेनाडे ,तयाप्पा तळवार, राहुल जाधव ,राहुल खापरखंडे आदी यंत्रमाग कामगारांचा आदर्श यत्रमाग कामगार म्हणून बौद्धधर्म गुरु भन्ते धम्मदीपजी यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले
इचलकरंजी महानगर जिल्हाध्यक्ष त्रंबक दातार , जनशक्ती असंघटित कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश तडाखे , ज्येष्ठ पत्रकार गजानन मोहिते ,बौद्ध धर्म गुरु भन्ते धम्मदीपजी ,राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवलेआदींनी आपले मनोगत व्यक्त केले .
यावेळी कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष दगडू कांबळे ,जिल्हा उपाध्यक्ष तानाजी शिंदे ,जिल्हा संघटक दिनकर थोरात , सिद्धार्थ गायकवाड , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजय इंगळे ,कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख समीर विजापूरे , हातकणंगले तालुका अध्यक्ष मुकेश घाटगे आदी उपस्थित होते
स्वागत व प्रास्ताविक पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष जयसिंगराव कांबळे यांनी केले तर आभार अॅड. राहुलराज हरिचंद्र कांबळे यांनी मानले