प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : दि.१९ सप्टेंबर २०२३ पासुन गणेशोत्सवास सुरुवात होणार आहे. इचलकरंजी शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने इचलकरंजी शहरात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन शहरवासीयांना अत्यंत आनंदी वातावरणात गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी महापालिका प्रशासन , पोलिस प्रशासन , महसूल प्रशासन यासह इतर संबंधित .प्रशासकीय यंत्रणांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि.१८ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेली होती.
सदर बैठकीत आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी येणारा गणेशोत्सव शहरातील सर्व नागरिकांना अत्यंत चांगल्या आणि आनंदी वातावरणात साजरा करणेत यावा यासाठी शहरातील सर्व शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी योग्य पद्धतीने समन्वय साधून काम करावे असे आवाहन केले.
या अनुषंगाने शहरातील गणेश मूर्ती आगमन आणि विसर्जन मार्गावरील रस्ते दुरुस्ती तातडीने करणेचे आदेश दिले.
त्याचबरोबर आगमन आणि विसर्जन मिरवणुक मार्गावरील अडथळा निर्माण होत असलेल्या विद्युत तारांची उंची आवश्यकते नुसार वाढविण्यासाठी एम.एस.ई.बी. प्रतिनीधी आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांचेशी समन्वयक साधून कार्यवाही करणेच्या सुचना दिल्या.
गणेशोत्सव कालावधीत मोठ्या संख्येने नागरिक देखावे तसेच गणेश मूर्ती पाहण्यासाठी बाहेर पडतात त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी निर्माण होत असते त्यामुळे शहरातील मुख्य गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करणेच्या सुचना दिल्या.
अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी येणारा गणेशोत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी दक्षता घेणेच्या सुचना दिल्या.
या बैठकीसाठी पोलीस उप अधिक्षक समीर साळवे, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल,अप्पर तहसीलदार मनोजकुमार ऐतवडे, सहा.आयुक्त केतन गुजर
पोलिस निरीक्षक सत्यवान हाके,राजु ताशिलदार, राजीव पाटील, कामगार अधिकारी विजय राजापुरे, शहर अभियंता संजय बागडे, महेंद्र क्षिरसागर,डॉ.अमित सोहणी, विद्युत अभियंता संदीप जाधव, मिळकत पर्यवेक्षक सचिन पाटील,परिवहन महामंडळाचे सागर पाटील, उद्यान पर्यवेक्षक सुनिल बेलेकर, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, अति.कार्यकारी अभियंता एम.एस.ई.बी.रमेश कदम आदी अधिकारी उपस्थित होते.