चितावणीखोर वक्तव्य करणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ ,माजी आमदार के. पी. पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करा

 मी इचलकरंजीकर संघटने तर्फे अप्पर पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी/प्रतिनिधी-

सुळकुड पाणी योजनेवरून चितावणीखोर वक्तव्य करणाऱ्या राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार के. पी. पाटील यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मी इचलकरंजीकर एक चळवळ पाण्यासाठी या संघटनेकडून अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

 या निवेदनात म्हटले आहे की ,इचलकरंजीसाठी स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी शासनाने दुधगंगा उद्भव सुळकुड पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. मात्र, सामान्य लोकांत दंगल घडवून हाणामारी व्हावी, याचा राजकीय फायदा मिळावा म्हणून राजकीय नेते चितावणीखोर भाषणे करत आहेत. यात मंत्री हसन मुश्रीफ यांनी रक्तपात होईल, तर माजी आमदार के. पी. पाटील यांनी कर्नाटकमधील नागरिकांना तलवारी घेऊन येण्याचे आवाहन केले. यांना राजकीय मते मिळवण्यासाठी दंगल घडवून सामाजिक वातावरण बिघडवायचे आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याची दखल घेऊन या दोन्ही नेत्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, भविष्यात पाणी योजनेवरून दंगल घडल्यास या दोन्ही नेत्यांना जबाबदार धरावे, असे निवेदनात म्हटले आहे.

     यावेळी अमित कुंभार, उमाकांत दाभोळे, विशाल माळी, मुकुंद तारळेकर अमोल् भोसले,प्रमोद पाटील, सुनील जाधव,रविकिरण हुक्कीरकर.. यांच्यासह मी इचलकरंजीकर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post