प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर आरोग्य विभागाची बैठक घेऊन शहरवासीयांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी स्वच्छता हा घटक अत्यंत महत्त्वाचा असलेने शहरातील स्वच्छतेबाबत दक्षता घेणेचे सक्त आदेश दिले होते.
या अनुषंगाने आज बुधवार दि.९ ऑगस्ट रोजी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी सकाळी अचानक शहरातील प्रभाग क्रमांक १ ते ५ मधील विकली मार्केट, नदीवेस रोड, मुख्य रस्ता या परिसरात भेट देऊन पाहणी केली आणि सदर प्रभागातील स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचारी यांना आवश्यक त्या सूचना देऊन स्वच्छतेच्या कामाबाबतीत नागरिकांच्या कडून कोणत्याही प्रकारची तक्रार आलेस संबंधित प्रभागातील स्वच्छता निरीक्षक, क्षेत्रीय कार्यालयाकडील मुख्य स्वच्छता निरीक्षक यांचेवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला.
यावेळी आयुक्त यांनी नागरिकांंशी संवाद साधुन स्वच्छता विषयक समस्या जाणून घेतल्या त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.