इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरात बंदी असलेल्या प्लॅस्टिक विरोधात मोहीम तीव्र

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

   इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने शासन निर्देशानुसार प्लॅस्टिक बंदी विरोधातील मोहीम तीव्रपणे राबविण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार आणि शहरातील सर्वच विभागीय कार्यालयाच्या क्षेत्रीय यांना अधिकारी दिले होते. या अनुषंगाने  सोमवार दि. २८ ऑगस्ट रोजी आरोग्य अधिकारी डॉ सुनिलदत्त संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर पालिकेच्या चारही विभागीय कार्यालया कडील क्षेत्रीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली  मुख्य स्वच्छता निरिक्षक, स्वच्छता निरीक्षक, वॉर्ड इन्स्पेक्टर यांचे समवेत बंदी असलेल्या प्लॅस्टिक विरोधात मोहीम राबविण्यात आली.

               आजच्या मोहिमेत शहरातील १० आस्थापनां कडुन एकुण रक्कम रुपये ३३०००/- इतका दंड वसूल केला.

            महानगरपालिकेच्या वतीने  बंदी असलेल्या प्लॅस्टिक विरोधातील मोहीम यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याने शहरातील व्यापारी, व्यावसायिक, छोटे फळ/भाजी विक्रेते त्याचबरोबर नागरिकांनी सुद्धा बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करू नये आणि कारवाई सारखे कटु प्रसंग टाळावेत असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडुन करणेत येत आहे. 

    आजच्या मोहिमेत  क्षेत्रीय अधिकारी नितिन सरगर, मुख्य स्वच्छता निरिक्षक संजय हातळगे, मंगेश दुरुगकर, स्वच्छता निरीक्षक सचिन भुते, विनोद जाधव,संग्राम भोरे, विशाल आवळे यांचेसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

   

         

Post a Comment

Previous Post Next Post