प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता. ११ ,समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले ( संपादक, दै.लोकमत, कोल्हापूर ) यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे. 'भारतीय स्वातंत्र्याची वाटचाल ' या विषयावरील हे व्याख्यान सोमवार ता.१४ ऑगस्ट २०२३ रोजी सायं. ६ वाजता समाजवादी प्रबोधिनीत होणार आहे. तरी या व्याख्यानाला इचलकरंजी परिसरातील सर्व जिज्ञासू बंधू-भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags
इचलकरंजी