कलाकारांना एसटी प्रवासामध्ये सवलतीसाठी मागण्यांचे निवेदन

 


                               

प्रेस मीडिया लाईव्ह 

    इचलकरंजी- इचलकरंजी व परिसरातील ग्रामीण भागातील अनेक कलाकारांना रात्रीच्या वेळी इचलकरंजीहून कोल्हापूर व कोल्हापूरहून इचलकरंजी येथे येण्या जाण्यासाठी रात्री ९ नंतर वेळेत व नियमित एसटी बस सुरू नसल्याने कलाकारांची गैरसोय होत असल्याने प्रवास करताना त्यांना बसस्थानक आवारात ताटकळत बसावे लागत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सदर मार्गावर रात्री ९ ते ११ यावेळी अर्धा ते पाऊण तास अंतराने एसटी बसेस सोडण्यात यावे. तसेच सर्व क्षेत्रातील कलाकारांना एसटी बस प्रवासामध्ये प्रवास भाड्यामध्ये सवलत मिळावी. तसेच बसमध्ये जेष्ठ कलाकारांना किमान दोन तरी राखीव आसन व्यवस्था केली पाहिजे. अशा आशयाचे लेखी निवेदन कलाकारांचे वतीने एसटी व्यवस्थापन अधिकारी यांना नुकतेच देण्यात आले आहे.                                                                                                                                              

   यावेळी इचलकरंजी व परिसर कलाकार संघटक- लालचंद पारिक, बाबासाहेब तांदळे, राजेंद्र फरांडे, विक्रमसिंह तांदळे, रसिक (बाबु) अपराध, अशोक सुर्यवंशी, असिफ संजापूरे, शिवाजी येडवान, देवा कवलगी, हणमंत भागवत, भानुदास तासगावे, बजरंग कांबळे, मिरासो शेख, अमर कोळी, बाबुराव ढेंगे, सुनील कुंभार, सचिन लाखे, मोहिनी खोत, गीतांजली डोंबे, सिमा भंडारे, वंदना भंडारे, धर्मराज जाधव, सखाराम जाधव, मोनिका जाधव आदींसह अनेक कलाकार उपस्थित होते.

प्रेस मीडिया लाईव्ह सद्दैव  कलाकारांच्या पाठीशी  उभी राहील.

संपादक 

Post a Comment

Previous Post Next Post