प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : प्रतिनिधी :
येथील कन्या महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्रा.डाॅ. प्रतिभा पैलवान यांना संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या वतीने यावर्षीचा संत तुकाराम महाराज समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
येत्या २० ऑगस्ट रोजी इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावी सातवे संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे,अशी माहिती साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष जगदिप वनशिव यांनी दिली.
शैक्षणिक, सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रा.डॉ.प्रतिभा पैलवान या राजहंस फौंडेशनच्या माध्यमातून तृतीयपंथीयांच्या संवेदनशील आयुष्यावर प्रकाश टाकण्यासाठी अगदी निरपेक्ष भावनेने काम करत आहेत. आजपर्यंत अनेक गरजू,अनाथ,वंचित आणि तृतीयपंथीयांच्या सामाजिक,शैक्षणिक विकासासाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. या कार्याची दखल घेऊनच त्यांची संत तुकाराम महाराज समाजरत्न पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.त्यामुळे त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.