रुकडी येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले



प्रेस मीडिया लाईव्ह : 

 भरत शिंदे : अतिग्रे प्रतिनिधी

    रुकडी येथे माझी उपसरपंच माननीय अमित कुमार भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन रेल रोको करण्यात आले पोलीस आणि आंदोलन यांच्यामध्ये काही काळ तणाव राहिला परंतु एक महिन्यांमध्ये सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन वरिष्ठ रेल अधिकारी रुकडी रेल स्टेशन अधिकारी जीडी रायकर यांच्यामार्फत आंदोलन कार्यकर्त्यांना रेल्वे विभागाने दिले .

रुकडी भुयारी मार्गातील समस्या सोडवण्यासाठी रेल्वे विभागाने 75 लाख रुपये मंजुरी दिली आहे त्याचे लवकरच काम सुरू करीत आहे असे रेल्वे विभागीय अधिकारी यांनी सांगितले एक्सप्रेस रेल रूकडी आणि गांधीनगर येथे थांबवण्यात यावी ही मागणी व इतर मागण्या एक महिन्यात मंजूर करा अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी बोलताना अमित कुमार भोसले यांनी सांगितले की एक्सप्रेस रेल्वे थांबण्यासाठी आम्हाला दिल्लीपर्यंत जावे लागले तर आम्ही जाऊ एक महिन्यानंतर मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करून रेल चक्का जाम करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी उपस्थित माजी उपसरपंच अमित कुमार भोसले सरदार शेख कुमार चव्हाण सुनील भारमल हनीफ पाटील संजू कोळी जितू देसाई सुरेश लोखंडे डी आर माने, बाळासो लोहार अमर आठवले सुरज माने अबू मुजावर अप्पू कापसे रुकडी पोलीस पाटील कविता कांबळे व महिलावर्ग मोठ्या प्रमाणावर सहभागी होते

     

Post a Comment

Previous Post Next Post