प्रेस मीडिया लाईव्ह :
अन्वर अली शेख :
देहूरोड : दरवर्षी आपल्या भारत देशात स्वातंत्र भारताचा प्रजासत्ताक दिवस तसेच गणतंत्र दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात आपण साजरा करत असतो यावेळी राष्ट्रध्वज फडकवून ध्वजास आदरपूर्वक मानवंदना /सलामी ही दिली जाते .
हा सण उत्सव साजरा करत असताना राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जाते ध्वज बांधताना त्याची बांधणी योग्य रीतीने होऊन ध्वज फडकवण्याबाबत चे काम मोठे जबाबदारी चे असते परंतु राष्ट्रीय ध्वज बांधण्याबाबत नागरिकांमध्ये आद्यप ही जागरूकता नसल्याने सहसा ध्वज बांधण्यासाठी कोणी पुढे येत नाही यासाठीच शालेय जीवनापासून शालेय शिक्षणासोबतच शाळांमध्ये ध्वज बांधण्याचे व ध्वज योग्य रीतीने फडकवण्या बाबतचे नियम विद्यार्थ्यांना शाळेत शिकवावे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रती आदर प्रेम व सद्भावना वाढीस लागेल यासाठी देहूरोड शहरातील काँग्रेस आय पक्षाचे युवक अध्यक्ष मलिक शेख यांनी देहूरोड कॅन्टन बोर्डाचे कार्यकारी अधिकारी अमित कुमार माने यांना लेखी पत्र देऊन कॅन्टोमेट बोर्डाच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज बांधण्याबाबतचे प्रशिक्षण देण्याबाबतची लेखी निवेदना द्वारे मागणी केली आहे यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डात निवेदन देण्यासाठी तालुका उपाध्यक्ष युवक काँग्रेसचे रईस शेख,देहूरोड शहर उपाध्यक्ष असिफ सय्यद, उपाध्यक्ष निलेश बोडके आदी उपस्थित होते