प्रेस मीडिया लाईव्ह
अन्वरअली शेख
देहूरोड शहर दि 4, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टात स्थगिती दिल्याने देहूरोड शहरात सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात आला . मलिक शेख व हाजी मलंग मारीमुत्तू यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोष साजरा करण्यात आला.
त्यावेळी उपस्थिती तालुका अध्यक्ष राजेश वाघोले यांनी संबोधन केले प्रांत सदस्य दीपक सायसर, तालुका अध्यक्ष गफूर भाई शेख , तालुका उपाध्यक्ष रईस भाई शेख तालुका सरचिटणीस रोहन भाऊ राऊत देहूरोड शहर उपध्यक्ष आसिफ सय्यद देहूरोड शहर उपाध्यक्ष निलेश बोडके तसेच मोहसीन शेख जरीन नाडार राजेश राऊत बाळू निसार सय्यद सुरज गायकवाड मोसिन शेख करीम शेख इत्यादी उपस्थित होते
आज कोर्टात घडलेल्या घडामोडी ....
मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यादरम्यान न्यायालयाने राहुल गांधी यांच्या विरोधात युक्तिवाद करणार्या तक्रारदार पूर्णेश मोदी यांचे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांना विचारले की, न्यायालयाने जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्याचे कोणते कारण दिले आहे. यापेक्षा कमी शिक्षा देता आली असती. त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेचे हक्कही अबाधित राहतील. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. अपील प्रलंबित असेपर्यंत शिक्षेला स्थगिती दिली जाईल. न्यायालयाच्या या आदेशासोबतच राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्वही बहाल करण्यात आले आहे. आता ते संसदेच्या अधिवेशनातही सहभागी होऊ शकणार आहेत. त्याचवेळी न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधी आता दुपारी ३ वाजता पक्षाच्या मुख्यालयात पोहोचतील. त्याचवेळी काँग्रेसने ट्विट करून लिहिले - द्वेषाच्या विरोधात प्रेमाचा हा विजय आहे. सत्यमेव जयते - जय हिंद.