रसायनी परिसरात रिक्षांच्या बॅटऱ्या चोरणारा गजाआड



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

रसायनी परिसरात रिक्षांच्या बॅटऱ्या चोरी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती. बॅटरी चोरीच्या प्रकारामध्ये रिक्षाचालक हैराण झाले होते. सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सीसीटीव्ही कॅमेरा गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस हवालदार संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वषण शाखा पोलीस निरिक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक संजीव पाटील, पोलीस हवालदार संदीप पाटील, सुधीर मोरे, राकेश म्हात्रे यांनी तपास करून बॅटरी चोराला गजाआड केले. खोपोली येथील राकेश तुळशीदास पडळकर असे बॅटरी चोराचे नाव आहे. याच्यावर रसायनी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीकडून रिक्षाच्या चार बॅटऱ्या (किंमत १६ हजार रूपये) जप्त करण्यात आल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post