प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-सरकारने अंमली पदार्थ वाहतूक विक्री आणि साठवनुकीला बंदी असतानाही दोन किलो गांजा बरोबर सोन्याची बिस्किटे विक्री साठी चाललेल्या युवकास एलसीबीच्या पथकाने अटक केली.कागल तालुक्यातील कापशी ते लिंगनूर रोडवर बाळीग्रे गावात रविवारी रात्री कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी नारायण पाटील उर्फ सागर पाटील (वय 31 रा.यादव गल्ली बाळकुंद्री ता.चंदगड )पुष्कर पाखले (रा.चाळीसगाव जळगाव) या दोघांच्यावर मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एलसीबीचे पोलिस अंमलदार महेश गवळी यांना खबरया कडुन समजलेल्या माहितीच्या आधारे गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजले वरून त्या ठिकाणी सापळा रचला होता.बाळीग्रे गावाच्या उसाच्या शेतात आडोशाने जाताना त्या युवकास ताब्यात घेऊन त्याच्या कडील पोत्याची तपासणी केली असता त्यात ओलसर दोन किलो गांजा सापडला आणि त्याच्या अंग झडतीत 100 ग्राम वजनाची दोन सोन्याची बिस्किटे सापडली.त्याने आपले नाव नारायण पाटील असल्याचे सांगितले.पोलिसानी अधिक चौकशी केली असता त्याने गांजा आणि लोकांना फसविण्यासाठी सोन्याची बनावट बिस्किटे मुंबईतील पुष्कर पाखले नावाच्या मित्राकडुन आणल्याचे सांगितले.चाळीस हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करून त्या दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.