प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
वि द्युत कार्यालयात संपर्क साधला असता नवीन मीटर बसविण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली.नादुरुस्त विद्युत मीटरच्या बदल्यात नवीन विद्युत मीटर बसविण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पेण विद्युत मंडळातील वायरमन योगेश बाबर याला रायगड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी रंगेहात पकडले.तर सोबत असलेला अभियंता भूषण जाधव हा घटना स्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाला आहे.
पेण शहरातील गांगल आळी येथे राहणारे तक्रारदार यांच्या राहत्या घरातील विद्युत मीटर नादुरुस्त झाला होता. तो विद्युत मीटर बदलून नवीन विद्युत मीटर बसविण्यासाठी तक्रारदार यांनी पेण येथील विद्युत कार्यालयात अर्ज केला होता. मात्र आठवडा उलटून गेला तरी नवीन विद्युत मीटर बसविला नाही. याबाबत तक्रारदार यांनी विद्युत कार्यालयात संपर्क साधला असता नवीन मीटर बसविण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली. या बाबत तक्रारदार याने रायगड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्यानुसार रायगड लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी सोमवारी २८ ऑगस्ट रोजी दुपारी पेण येथील विद्युत मंडळाच्या आवारात सापळा रचला होता. मात्र दोन्ही आरोपींनी तक्रारदार यास रामवाडी, पेण येथे बोलावले त्यानुसार रामवाडी परिसरात दहा हजार रुपयांची लाच घेताना वायरमन प्रमोद बाबर याला रंगेहात पकडले तर सोबत असलेले अभियंता भूषण जाधव हे घटना स्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.