प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे वारणानगर मध्ये 9 कोटी चोरी प्रकरणातील संशयीत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरज विष्णू चंदनशिवे (वय 42 रा.वासूद सांगोला) यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला.
ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली.या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.चंदनशिवे बुधवारी रात्री शत पावली करण्यास गेले होते.त्यावेळी तेथे दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर वार केला असता त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.बराच वेळ झाला तरी घरी न आल्याने त्यांच्या कुंटुबियांनी शोधाशोध घेत असताना वरील ठिकाणी त्यांचा मृतदेह आढ़ळून आला.ही माहिती त्यांच्या कुंटुबियांनी पोलिसांत दिली.अधिक तपास सोलापूर पोलिस करीत आहेत.