पुण्याच्या डॉ. तुषार निकाळजे यांचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड विक्रमात सहभाग



प्रेस मीडिया लाईव्ह : 

चेन्नई (तामिळनाडू) :- ई.एस. एन. पब्लिकेशन (इंडिया) व लंडन ऑर्गनायझेशन ऑफ स्किल डेव्हलपमेंट (लंडन) यांनी आयोजित केलेल्या "थिकेस्ट बुक इन द वर्ल्ड"  या जागतिक विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे .


या शैक्षणिक संस्थांनी जगातील सर्वात जाड पुस्तक दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी तामिळनाडू येथे प्रकाशित केले आहे. हे पुस्तक 5.80 मीटर (19 फूट 034 इंच) इतके जाड  आहे. यामधील पृष्ठांची संख्या एक लाख पेक्षा जास्त आहे . या पुस्तकाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली  आहे. या उपक्रमामध्ये पुण्याचे लेखक व संशोधक असलेले डॉ. तुषार निकाळजे यांनी देखील सहभाग घेतला होता. डॉ. निकाळजे यांच्या   sacrifice of 25 paise tea (चार आण्याच्या चहाच्या त्यागाची गोष्ट) या इंग्रजी  पुस्तकाचा समावेश वरील उपक्रमात  करण्यात आला आहे.

या उपक्रमात भारतातील जवळपास 250 संपादक व लेखक यांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये  पुण्याच्या डॉ. तुषार निकाळजे यांची संपादक म्हणून नोंद झाली  आहे. डॉ. तुषार निकाळजे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी आहेत. त्यांच्या एकूण 32 वर्ष विद्यापीठातील सेवेपैकी 27 वर्षे परीक्षा विभागात सेवा झाली आहे. डॉ. निकाळजे हे मार्च 2022 मध्ये परीक्षा विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. डॉक्टर निकाळजे यांनी आजपर्यंत 12 पुस्तके, 76 लेख लिहून प्रकाशित केले आहेत.तसेच 4 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये सहभाग घेतला आहे. 

डॉ. निकाळजे यांची दोन पुस्तके महाराष्ट्रातील सात विद्यापीठे व तीन स्वायत्त महाविद्यालये  यांच्या बी. ए व एम. ए. अभ्यासक्रमांना संदर्भ पुस्तक म्हणून मान्यता मिळाली आहे. याचबरोबर अंध व्यक्तींसाठी "अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी" हे ब्रेल-  इंग्रजी पुस्तकदेखील लिहून प्रकाशित केले आहे. या पुस्तकाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली  आहे. डॉ. निकाळजे यांनी नुकतीच "क्लर्क टू वर्ल्ड रेकॉर्ड"  या माहितीपटाची  निर्मिती केली आहे. या माहितीपटाची  नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली  आहे.

Post a Comment

Previous Post Next Post