कडेगांव च्या प्रा.डॉ.संगिता पाटील. यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित



प्रेस मीडिया लाईव्ह : 

  बेळगाव -  प्रा.डॉ. संगीता यशवंत पाटील या अनेक वर्षांपासून आटर्स ॲन्ड कॉमर्स  कॉलेज  कडेपुर  च्या कॉलेज मध्ये प्राध्यापिका म्हणून सेवा करत आहेत. तसेच त्यांचे सामाजिक, कला, क्रिडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करत असतात. व गोर -गरीब शोषित पिडीत वंचितांना आणि गरजु लोकांसाठी त्या आर्थिक मदत व साहित्य वाटप करत असतात. अनेक अनाथ आश्रमांना भेट देऊन त्यांना गरजु वस्तु देत असतात. या कार्याची दखल घेऊन अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अनेक राज्यांमध्ये पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 

त्यांचा स्वभाव मनमिळाऊ व सर्वांना हवे असणार्या संगिता मॅडम त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्यामुळे त्यांना एशिया इंटरनॅशनल कल्चरल रिसर्च चेन्नई युनिव्हर्सिटी यांच्या कडुन शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे. त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post