निपाणीत 9 ऑगस्ट क्रांती दिन उत्साहात संपन्न.....
प्रेस मीडिया लाईव्ह :
भारताच्या इतिहासात 9 ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो. ब्रिटीशांना भारतातून हाकलून देण्यासाठी महात्मा गांधींनी आपलं शेवटचं स्वातंत्र्य युद्ध 'भारत छोडो', 'चले जाव' आंदोलनाच्या रूपात लढण्याची घोषणा केली होती. जी आज ऑगस्ट क्रांती म्हणून ओळखली जाते. असे प्रतिपादन एम ए नाईक यांनी केले ते निपाणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालयात 9 ऑगस्ट क्रांती दिन आयोजित कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते........
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सचिन लोकरे यांनी केले,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती राजू गुंदेशा हे होते ....
पुढे बोलताना नाईक म्हणाले.महात्मा गांधी यांच्याकडे माणसे जोडण्याचे कौशल्य होते. 1942 ची चळवळ गांधीजींनी इंग्रजांच्या विरोध उभी करून करो या मरो असा अंतिम नारा दिल्यानंतर ही चळवळ मोठ्या स्वरूपात भारत देशामध्ये उभी राहिली देशाला स्वतंत्र मिळण्यास मदत झाली असल्याचे सांगितले.....
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने म्हणाले. भारत देश स्वतंत्र होण्यामध्ये महात्मा गांधीजींचे योगदान खूप मोठ्या स्वरूपाचे आहे. त्यांनी करो या मरो. असहकार चळवळ . छोडो भारत चले जाओ. विविध सत्याग्रह. या सर्व बाबतीत ब्रिटिश व्यवस्थेला हादरा देण्याचे काम केलेले होते. भारत देश हा एकजूट ठेवण्याचे कार्य महात्मा गांधीजी यांनी केले असल्याचे सांगितले... डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमास कबीर वराळे रेखा कांबळे ग्रंथपाल गोरखनाथ मधाळे सचिन लोकरे बाबासाहेब कळसकर मधुकर पकाले कदम सर संतोष मेस्त्री धनाजी कांबळे विठ्ठल वाघमोडे कुरणे गुरुजी,आरेश सनदी, अविनाश माने भिकाजी कांबळे बाबासाहेब कांबळे. यांच्यासह लालबावटा कामगार संघटनेचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.........