पोलीस अधीक्षक, कार्यालय औरंगाबाद ग्रामीण घरफोडी करणारे सराईत आरोपींची आंतर जिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

औरंगाबाद : विशेष प्रतिनिधी :

औरंगाबाद : पोस्टे पाचोड येथे फिर्यादी नामे प्रमोद भगवानराव पन्हाळकर रा. विहामांडवा ता. पैठण जि. औरंगाबाद यांनी पोस्टे पाचोड येथे फिर्याद दिली की, दि. १८/०८/२०२३ रोजीचे रात्री आठ वाजेपासून ते दि. १९/०८/२०२३ रोजीचे सकाळी ०५.०० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरटयांनी विहामांडवा गावातील त्यांचे मालकीचे किसान मशनरी दुकानाचे शटर तोडून दुकानातील समर्शिबल मोटार कॉपर वायर, मोनो ब्लॉक मोटार कॉपर वायर, मोटार बुश असा मुददेमाल कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरून नेले बाबत तक्रारीवरून पोस्टे पाचोड येथे प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्हयाचा मा. मनिष कलवानिया पोलीस अधिक्षक साहेब, औरंगाबाद ग्रामीण यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असतांना सतिष वाघ, पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, सदर गुन्हा हा सराईत गुन्हेगार टोळीतील आरोपीनामे १) मोहसीन खान नदीर खान वय २६ वर्ष, रा. महेबुबनगर, ता. जि. अमरावती, २) चेतन सुकलाल ठाकरे वय २५ वर्ष, रा. मंगरूळदस्तगिर, ता. धामणगांव रेल्वे जि. अमरावती यांनी त्यांचे इतर साथीदारासोबत मिळून केला आहे. नमूद बातमीवरून त्यांनी तात्काळ स्थागुशाचे पथक तयार करून रवाना केले. पथकातील पोउपनि मधुकर

मोरे यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फत खात्रीलायक माहितीचे ठिकाणी ज्यात जालना, पुसद, कारंजा, अमरावती, नांदगांव खंडेश्वर येथे सतत तीन दिवस आहोरात्र त्यांचा पाठलाग करून आरोपीतांचा शोध घेतला असता वर नमूद आरोपी क्रं. १ व २ हे मिळून आले त्यांना त्यांचे गुन्हयांविषयी व इतर साथीसदारांबाबत विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी त्यांचा साथीदारनामे ३) सोहेल बासेद जुला वय २८ वर्ष, रा. डिग्रस जि. यवतमाळ मुळ रा.मोमीनपूरा बीड यांच्या व इतर साथीदारा सोबत करुन गुन्हयातील चोरलेला मुद्येमाल हा आरोपी क्र.४) अस्लमखा

गुलाबखा पठाण वय ४२, रा. मधुकरनगर, पुसद, जि. यवतमाळ भंगार व्यापारी यास विक्री केला असल्याचे सांगीतल्याने सदर आरोपीचा दिले पत्यावर शोध घेतला असता ते मिळून आले. त्यांना गुन्हयातील मुद्येमाला बाबत विचारपूस करता त्यांनेही गुन्हयातील मुददेमाल हा जास्त रक्कमेला आरोपी क्रं. ५) शेख शकील शेख हफीज ३२ वर्ष, रा. नांदगांव खंडेश्वर जि. अमरावती यास विक्री केला असल्याचे सांगितले त्याचाही त्याचे राहते पत्यावर शोध घेता तो मिळून आला.

नमूद आरोपीतांना गुन्हयांसंबंधी विश्वासात घेवून विचारपूस करता त्यांनी नमूद गुन्हा केल्याचे कबूली दिल्याने नमूद आरोपी क्रमांक १ यांने व आरोपी क्रमांक ३ यांनी व इतर आरोपीतांना गुन्हा करण्यासाठी वापरलेली वाहने त्यांच्या ताब्यातून विना क्रमांकाची इंडिका विस्टा कार व आरोपी क्रं. ३ याचे ताब्यातून गुन्हा करण्यासाठी वापरलेली टोयोटा इनोव्हा कार क्रमांक एमएच-२७, असी-९०६० अशी मिळून आले.

तसेच वरील नमूद दोन्ही वाहनांमध्ये गुन्हे करण्यासाठी वापरलेले साहीत्य एक लोखंडी सब्बल, एक लोखंडी कॅची, एक लोखंडी पक्कड, शटर कट करण्यासाठी वापरण्यात येणारे कटर असे घरफोडी करण्याचे साहीत्य तसेच मोबाईल हॅन्डसेट नगदी रुपये ५०००/- असे एकूण ५,४५,७००/- रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून नमूद आरोपीतांना पुढील कायदेशीर कार्यवाही कामी पोस्टे पाचोड येथे हजर करण्यात आले आहे. तसेच आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याने त्यांनी जिल्हयातील व इतर जिल्हयात बरेच घरफोडीचे अनेक गुन्हे केले असल्याची शक्यता आहे. नमूद गुन्हयातील आरोपीतांचे इतर साथीदारांबाबत अधिक तपास सुरू आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. मनीष कलवानिया, अपर पोलीस अधीक्षक श्री. सुनिल लांजेवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सतीष वाघ, सपोनि सुधीर मोटे, पो.उप.नि.

मधुकर मोरे, पोह लहु थोटे, पोह कासीम शेख, पोह रवि लोखंडे, पोह विठठल डोके, पोअं योगेश तरमाळे, आनंद घाटेश्वर, पोअं राहुल गायकवाड, चापोशि संजय तांदळे यांनी केली .


Post a Comment

Previous Post Next Post