होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना उजळणी पुस्तकांचे मोफत वाटप उपक्रम कौतुकास्पद – मु.अ. प्रांजली दशरथ



प्रेस मीडिया लाईव्ह :

अब्दुल कय्यूम :  विशेष प्रतिनिधी 

औरंगाबाद -मराठा प्राथमिक शाळा चौराहा या प्रशाळेतील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या वंचित दुर्बल घटकातील गरजू व होतकरू १०० मुला मुलींना एनजीओ बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन व सद्गुरु सेवा प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उजळणी पुस्तकांचे व खाऊचे मोफत वाटप करण्यात आले. 

   फाऊंडेशनचा उज्वल भविष्य हा उपक्रम आमच्या प्रशालेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही. बोधी फाऊंडेशनच्या वतीने उजळणी पुस्तकांचे व खाऊचे मोफत वाटपाचा उपक्रम हा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रांजली दशरथ यांनी केले. 

  बोधी फाऊंडेशनच्या वतीने पुस्तकाचे व खाऊचे मोफत वाटप मंचावरील मान्यवरांच्या हस्ते झाले. 

     पुढे बोलताना प्रशालेच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या की, विद्यार्थ्यांची वाचन लेखन विषयक अभिरुची या पुस्तकामुळे नक्कीच वाढेल यात शंका नाही. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि त्यांचा शैक्षणिक दर्जा वाढला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

    यावेळी मंचावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रांजली दशरथ, बोधी फाउंडेशनचे अध्यक्ष रामदास वाघमारे, जीवन वाघमारे यांच्यासह शिक्षक वृंद शोभा रामचंद्र गुंजाळ,किरण उत्तमराव सपाटे,एजाज अहमद खान, महेश आप्पाराव भावले,विजयकुमार नारायणराव साबळे,सोमनाथ हरी चव्हाण इत्यादी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post