प्रेस मीडिया लाईव्ह :
औरंगाबाद : विशेष प्रतिनिधी :
औरंगाबाद : दिनांक-10/07/2023 रोजी रात्री फिर्यादी अशोक बबन कसारे रा. इंदीरानगर गारखेडा छ. संभाजीनगर रात्रीला त्यांचेकडे असलेला OPPO A55 कंपनीचा मोबाईल किंमत- 6000/ रुपये व रोख 4000-/ हजार रुपये एकुण-10.000-/ हजार रुपयाचा मुद्देमाल राहते घरातुन रात्रीला कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला या बाबत पोलीस स्टेशन जवाहरनगर गुरनं- 173/2023 कलम 380 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला.
दोन दिवसापासुन सदर घरफोडीबाबतची माहीती जवाहरनगरचे पोलीस हवालदार/1702 चंद्रकांत पोटे व पोलीस अंमलदार/ 2482. मारोती गोरे, यांना मिळाली होती. परंतु आरोपी सतत लोकेशन बदलत असल्याने हाती लागत नव्हता. परंतु आखेर शेवटी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी साहेब यांना सदर बाबतची माहीती दिली.
सदर गुन्हा उघडकीस आणणे बाबत साहेबांनी योग्य त्या सुचना दिल्या. दिनांक-25/08/2023. रोजी गुप्त बातमीदाराकडुन सदर गुन्ह्यातील आरोपी नामे साजेद अजिस वय-37 वर्ष, रा इंदीरानगर, गारखेडा परिसर छ. संभाजीनगर. हा झेंडा चौक शिवाजीनगर येथे आल्याचे माहीती मिळाल्यावरुन ASI गौरख चव्हाण, मारोती बी. गोरे, विजय सुरे, विनोद बनकर, असे तात्काळ माहीतीमिळालेल्या ठिकाणी जावुन त्यास ताब्यात घेतले. त्याला अधिक विश्वासात घेवुन सदर दाखल गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता. त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यावरुन सदर आरोपीने OPPO A55 कंपनीचा मोबाईल हा एक महिन्यापुर्वी 1000-/ रुपयामध्ये सलमान सलीम शेख रा. इंदीरानगर, गारखेडा परिसर छ.संभाजीनगर याला विकला असे सांगीतले सदर मोबाईल वापरकर्ता हा गुन्हे शाखा यांनी संशयीत म्हणुन मोबाईलसह हजर केला. सदर घरफोडीतील आरोपी नामे - साजेद अजिस वय-37 वर्ष, रा इंदीरानगर, गारखेडा परिसर छ. संभाजीनगर. त्यास रोख रक्कम बाबत विचारले असता, सदर रक्कम त्याने दारु व जुगारामध्ये खर्च
केल्याचे सांगीतले. यांचे कडुन चोरीस गेलेला मुदेमाल 4000-/ हजार रुपये पैकी 1300/ रुपये ताब्यात घेतले.
पुढील तपास स.फौ. गौरख चव्हाण हे करित आहेत. सदर आरोपीवर पोस्टे उस्मानपुरा, गुरनं-298/2008 कलम 392,34. भादवी प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. मनोज लोहीया साहेब, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-02, श्री. शिलवंत नांदेडकर साहेब, मा. सहाय्यक पो. आयुक्त श्री. रंजीत पाटील साहेब, उस्मानपुरा विभाग, वरिष्ट पोलीस निरीक्षक श्री. अशोक गिरी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली ASI गौरख चव्हाण, चंद्रकांत पोटे पोह/1702, मारोती गोरे पोअ/2482, विनोद बनकर, विजय सुरे, यांनी उत्कृष्ट कामगीरी केली.