हल्लेखोरांवर कारवाईच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांकडे विभागीय आयुक्तांमार्फत निवेदन सादर
प्रेस मीडिया लाईव्ह :
औरंगाबाद (प्रतिनिधी):-
जळगांव जिल्ह्यातील पत्रकार संदिप महाजन यांच्यावर पाचोरा येथील शिंदे गटाचे आ. किशोर पाटील यांच्या काही गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पत्रकार संदिप महाजन जखमी झाले. आ. किशोर पाटील यांचेकडून पत्रकार संदिप महाजन व त्यांच्या कुटुंबीयांच्या जिवितास धोका निर्माण झाला असल्याबाबतची तक्रार पत्रकार महाजन यांनी पोलीस स्टेशनला केली आहे. आ. किशोर पाटील यांची आमदारकी रद्द करून कारवाई करण्यात यावी.
पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढलेले आहेत.यासंदर्भात शासनाने पत्रकार संरक्षण कायद्याचे प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी तसेच झालेल्या घटनेबाबत पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली असून शासनाने संबंधितांविरुध्द त्वरित कार्यवाही करावी अन्यथा पत्रकार बांधव मुंबई येथे आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा व्हॉईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत निवेदनद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी व्हॉईस ऑफ मिडियाचे साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष अब्दुल कय्युम अब्दुल रशिद, परवेज खान, शेखलाल शेख, ज्येष्ठ पत्रकार संजय हिंगोलीकर, रमेश जाबा, रामेश्वर दरेकर, बबन सोनवणे, शेख शफिक, गणेश पवार, अंबादास तळणकर, सुरेश क्षिरसागर, नदीम सौदागर, मोहम्मद इसाकोद्दीन, सय्यद शब्बीर, बाजीराव सोनवणे, देविदास कोळेकर, गोरख जैस्वाल, महेश मुरकुटे, युनुस खान आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.