नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रपतींना अकोला जिल्हाअधिकारी मार्फत निवेदन
प्रेस मीडिया लाईव्ह :
अकोला : प्रतिनिधी :
मनीपुर मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारा विरोधात नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रपतींना अकोला जिल्हाअधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले .
या निवेदना मध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फांशीची शिक्षा देण्यात यावी तसेच सुमय्या अली संस्थापक अध्यक्षा म्हणाले की मनीपुर मध्ये महिलांचे परीजनांचे खून करणे, महिलांना निर्वस्त्र धिंड काढणे, नंतर महिलाची आबरू लूटने ही घटना देशासाठी खूप लज्जा स्पद आहे , या करीता आम्हा महिलांना स्वतःची रक्षा स्वतः करता यावी या करीता आम्हा महिलांना शस्त्र ठेवणयाचे परवाने सुद्धा देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
आज पर्यंत महिलां सोबत अनेक घटना घडल्या आहेत आणि सध्या पण सुरू आहेत , या अगोदर निर्भया प्रकरण, बिलकिस बानो प्रकरण, मनीषा प्रकरण, अशी अनेक प्रकरणे समोर आलेले आहेत , जर या प्रकरणा मधील आरोपींना फांशीची शिक्षा झाली असती तर आज मणिपुर प्रकरण घडलेच नसते. या करिता मणिपुर प्रकरणातील आरोपींना फाशीचीची शिक्षा देण्यात यावी अशी मागनी नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
या वेळी निवेदन देतांना संस्थापक अध्यक्षा सुमय्या अली नारी शक्ति राखी ताई, नारी शक्ति चित्रा ताई, नारी शक्ति रिनी ताई, नारी शक्ति ठाकरे ताई, नारी शक्ति रश्मि ताई आदि महिला उपस्थित होते