प्रेस मीडिया लाईव्ह :
परभणी : डॉ.शिवाजी शिंदे : जिल्हा प्रतिनिधी .
परभणी: ता.31 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल संभाजी भिडे यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व तात्काळ भिडे यांना अटक करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांची सोमवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपूडकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीतून संभाजी भिडे यांच्या विरोधात तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून घ्यावा व भिडे यांना अटक करावी अशी मागणी करण्यातआली.यावेळी माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, महानगर अध्यक्ष नदीम इनामदार, प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, माजी नगरसेवक सुनील देशमुख, अमोल जाधव, नाकसेन भेरजे, सत्तार पटेल,अब्दुल सईद, सुहास पंडित, दिगंबराव खरवडे,प्रदीप सोनवणे, मुंजाभाऊ गायकवाड, अनिल घाटगे, हरिभाऊ घुले,कैलास टेकाळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.