प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : अमरावती येथे मनोहर भिडे यांनी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत अपमानकारक विधाने करून त्यांचा अपमान केला. मनोहर भिडे सारखी व्यक्ती राष्ट्रपित्याबद्दल टिकाटिप्पणी करतो ही गोष्ट संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी आहे. सर्वधर्मसमभाव ही आपल्या देशाची खरी ओळख आहे, पण ही ओळख पुसण्याचा मनोहर भिडे सारख्या मनुवादी प्रवृत्तीचा प्रयत्न आहे. या मनुवादी मनोहर भिडेच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कसबा पेठ येथील फडके हौद चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी निषेध व्यक्त करताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. मनोहर भिडे वारंवार असं बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. मनोहर भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो ? पुरोगामी विचार संपवण्यासाठी एक यंत्रणा काम करते, महापुरुष हे सर्वकालीन असतात, त्यांच्या विचारांचे आणि कृतीचे समाजाच्या उभारणीत मोठे योगदान असते. असे असताना हा सततचा खोडसाळपणा सरकारने सहन करू नये. महापुरूषांच्या विषयी या विकृत भिडेने अत्यंत अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ संभाजी भिडेवर गुन्हा दाखल करून त्वरीत कठोर कारवाई करावी.’’
या आंदोलनामध्ये माजी महापौर कमल व्यवहारे, अजित दरेकर, संगीता तिवारी, लता राजगुरू, रफिक शेख, रजनी त्रिभुवन, मेहबुब नदाफ, सुनिल शिंदे, सुजित यादव, हनुमंत पवार, बळीराम डोळे, अक्षय माने, रविंद्र माझिरे, बुवा नलावडे, जयसिंग भोसले, प्रियंका रणपिसे, रमेश सकट, रमेश सोनकांबळे, रवि आरडे, संतोष पाटोळे, विशाल जाधव, विकी खन्ना, भगवान कडू, विनोद रणपिसे, प्रकाश पवार, अभिजीत गोरे, आशितोष शिंदे, योगेश भोकरे, युवराज मदगे, अनुसया गायकवाड, छाया जाधव, उषा राजगुरू, सुंदरा ओव्हाळ, निलिनी दोरगे, पपिता सोनावणे, सिमा सावंत, वैशाली रेड्डी, शिवानी माने, मिलिंद अहिर, नरसिंह अंदोली, मयुर भोकरे, अमित मोरे, राज गेलोत, देवीदास लोणकर, सचिन भोसले, अनिल पवार, हरिदास अडसूळ आदी सहभागी झाले होते.