खुर्ची आणि सत्तेसाठी "कांही पण " हाच त्यांचा आजेंडा



प्रेस मीडिया लाईव्ह : 

 मनिपुरची अमानुष घटना व केंद्रसरकारची  विषेशेषत्वाने मोदी - शहाची असंवेदनशिलता ,डोळेझाक हे डोळ्याआड करता येत नाही .केवळ अन् केवळ खुर्ची आणि सत्तेसाठी "कांही पण " हाच त्यांचा आजेंडा . थोडं मागे जाउन शहा मोदींची, वृत्ती ,कृती ,इतिहास तपासतांना त्यांचे क्रुर चेहरे स्पष्ट दिसतात .


2002 साली मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते ,त्यावेळी हिन्दु विरुध्द मुस्लीम दंगल उसळली .त्याचा फायदा घेउन ,पोलीस यंत्रणेला हाताशी धरुन शहा - मोदींनी विरोधकांवर निशाणा (टार्गेट ) साधुन वेचुन मानसं मारली .अगदी खासदार असणारया एका व्यक्तीला त्यांच्या कुटुंबासमोर कापले .बिल्कीस बानोच्या परीवाराला ठार केलं ते कमी का काय तिच्यावर सामुहिक बलत्कार केला ती केह गेली 21 वर्षे चालु असुन परवा त्या खुण्यांना ,गुन्हेगारांना सोडुन दिले . अनेक थापा ,अश्वासने देउन मोदींनी भारतवाशीयांना  स्वप्न दाखविली त्यात काँग्रेशी गलथान कारभार ,भ्रष्टाचार ,घराणेशाहीमुळे जनतेला ही बदल हव होता .याचा मेळ बसला नि मोदींची पंतप्रधानपदी प्रतिष्टापणा झाली .

मोदींच्या हाती सत्ता येताच तथाकथित धर्मवाद्यांचा उन्माद वाढला .R S S व तत्सम पिलावळीने देशात अल्पसंख्याकांना नाहक छळायला सुरुवात केली .त्यांच्या अनेक गुन्हेगारांवर ना केसीस ना कारवाई ! "ज्याच्या हाती ससा तो पारधी " मोदी - शहा यांनी सर्व सरकारी यंत्रणा मग ती  E D ,C B I तपास ,गुप्तचर यंत्रणा यांवर वचक ठेउन त्यांना मांडलीक बनवलय  अगदी निवडणुक आयोग सुध्दा दावणीला बांधला .

अलिकडील  निवाड्यावरुन पाहिले तर  न्यायालय सुध्दा कच्छपी ठेवलय .

मोदी शहा गोद्रा हत्याकांडातले दोषी ,गुन्हेगार ,त्यांच्या विरोधात निष्पक्ष लोहिया यांचे समोर खटला चालणार ,लोहींयाचा खुण झाला ,पुढे खटला चालुन दोघांना ही क्लिनचिट मिळाली .त्याबद्दल मोदी शहा भक्तांनी जल्लोष केला व पुन्हा तयांना माज आला .सनातन संस्था ही त्यातलीच शाखा ,दाभोळकर ,पाणसरे ,कलबुर्गी ,लंकेश यांना एकाच प्रकारे सुर्योदय होत असतांना गोळ्या घालुन ठार केले .13 वर्षे उलटली तरी नेमके खुनी सापडत नाही व न्याय चाचपडत आहे .देशांतर्गत कठिण परीस्थीती असतांना पंतप्रधानांचे जगभर दौरे चालु आहेत मणिपुर हे ठळक उदा . त्यांच्या अंधभक्तानी मोदींना "विश्वगुरु "ही पदवी देउन टाकली .

मोदींनी दिलेली अश्वासनं पाळली नाहीत ,भ्रष्टाचार ,काळा पैसा ,बेरोजगारी कमी होण्याऐवजी वाढतच आहे  ,मात्र मोठमोठ्या उद्योगपतींना अभय ,संरक्षण मिळुन त्यांच्या संपत्तीत अपार वाढ होतांना आपण पहातोय ते लोण मनिपुरच्या अमानुष घटनेमागे असल्याचे उघड होत आहे .

सत्तेसाठी शहा मोदी कोणत्या टोकाला जाउ शकतात हे या सर्व घटनांवरुन लक्षात येतय .हे नरसव्हांरक ,क्रुर ,मानव भक्षक देशाला विनाशाच्या टोकावर घेउन चाललेत त्यांना टोकायला हवे .


-- राणे तथा बजरंग लोणारी ,इचलकरंजी .

Post a Comment

Previous Post Next Post