नरेंद्र मोदी ‘चले जाव’ आंदोलन सर्वांनी सहभागी व्हावे. - अरविंद शिंदे, अध्यक्ष-पु.श.काँ.क.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

 

 

पुणे : १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नियोजित पुणे दौऱ्याच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे गट), रिपब्लिकन व डाव्या तसेच आंबेडकरवादी, पुरोगामी पक्ष संघटना यांच्या वतीने १ ऑगस्ट रोजी ठिक सकाळी ९.०० वा., मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथे नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून नरेंद्र मोदी चले जाव आंदोलन करण्यात येणार आहे.

 

     मणिपूर येथील हिंसाचार व महिला अत्याचाराच्या घटनांकडे होत असलेले दुर्लक्ष तसेच संसदेला सामोरे न जाता विरोधकांचा केला जाणारा अनादर यासह केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ होणाऱ्या सदर आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, पुणे शहर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशांत जगताप, शिवसेना (उध्दव ठाकरे गट) चे संजय मोरे व गजानन थरकुटे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, डाव्या चळवळीचे अजित अभ्यंकर, नितीन पवार, सुभाष वारे, डॉ. अभिजीत वैद्य, विश्वंभर चौधरी, शरद जावडेकर, लुकस केदारी इ. सह संबंधित पक्षांच्या प्रमुख मान्यवरांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाच्याच ठिकाणी निषेध सभा घेतली जाणार असून यात मान्यवर आपले मत व्यक्त करतील.

 

     सदर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज माननीय पोलीस आयुक्त रितेश कुमार, अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या समवेत काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट झाली. सदर भेटीमध्ये आंदोलना विषयी चर्चा होऊन नियोजित ठिकाणी आंदोलन करण्यास कोणतीही हरकत नसल्याचा निर्वाळा संबंधित अधिकाऱ्यांनी दिला आहे.

      दरम्यान संसदीय लोकशाही परंपरा पायदळी तुडविण्याचे काम नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाकडून सुरू असून मणिपूर प्रकरणी नरेंद्र मोदी यांचा व्यवहार हा संपूर्णत: हुकूमशाही वृत्तीचा आहे. तसेच संपूर्ण देश प्रधानमंत्री यांनी संसदेत मणिपूर प्रकरणी निवेदन करावे याची वाट पाहत असताना ते टाळून प्रधानमंत्री पुणे येथे पुरस्कार व उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असल्याने त्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करीत सर्व विरोधी पक्षांच्या वतीने होणाऱ्या नरेंद्र मोदी ‘चले जाव’ आंदोलनात सर्वसामान्य पुणेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले.

     उद्या होणाऱ्या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे गट), रिपब्लिकन युवा मोर्चा व डाव्या चळवळीतील सी. पी. एम., सी. पी. आय., अंग मेहनती कष्टकरी समिती, सुराज्य सेना, भारत जोडो अभियान, जनता दल सेक्युलर, समाजवादी पार्टी, बी. आर. एस. पी., सी. पी. आय., एम. एल., युवक क्रांती दल, महात्मा फुले प्रतिष्ठाण, आरोग्य सेना, शिक्षण हक्क सभा, जनता दल युनायटेड, सत्यशोधक आघाडी, निर्भय बनो आंदोलन, जबाब दो आंदोलन, रिजनल ख्रिश्चन सोसायटी यांच्या सह इतर अनेक संघटना सहभागी होणार आहेत. 

Post a Comment

Previous Post Next Post