किरीट सोम्मया प्रकरणाने भाजपचे खरे रूप जनतेसमोर उघड; कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरणार - आप महिला आघाडी
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडीओत सोमय्या आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहेत. त्यांच्यासारख्या बड्या राजकीय नेत्याचा खासगी व्हिडीओ व्हायरल होत आहे हे भाजपाच्या इतर अनेक नेत्यांच्या चरित्राचे ट्रेलर आहे. महिलांचे शोषण करण्यात भाजपचे अनेक नेते उघडे पडत आहेत. सोम्मया विरोधात अनेक तक्रारी येत होत्या, परंतु केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे गुन्हे नोंदविले जात नव्हते. किरीट सोमय्या यांच्यावर पोलिसांनी सोमोटो कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आप महीला प्रदेशाध्यक्षा सीमा गुट्टे यांनी केली आहे.
भाजपचे अनेक नेते सार्वजनिक जीवनात वावरताना त्यांचे वेगळे चरित्र दाखवितात आणि खऱ्या जीवनात बंद दरवाज्याच्या आत ते आपले गुण दाखवत असतात कधी महिलेला धमकावून तर कधी महिलेचा गैरफायदा घेत अशा प्रकारे महिलांचे शोषण केले जात आहे. सोमय्यावर त्वरित कारवाई करावी अन्यथा आप महिला आघाडी रस्त्यावर उतरेल असा इशारा शहराध्यक्षा अमरजा पाटील यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.