प्रेस मीडिया लाईव्ह
शिरोळ/ प्रतिनिधी:
महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून शेडशाळ (ता. शिरोळ) येथील स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील महिला फाउंडेशन देशी वाण बीज बँकेच्या वतीने प्रांताधिकारी मोसमी चौगुले बेर्डे व श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून देशी वाण बीजांचे टोकण करण्यात आले. तसेच डॉक्टर्स डे निमित्ताने गावातील सर्व डॉक्टरांचाही सत्कार करण्यात आला.
शेडशाळ येथील 130 महिलांनी एकत्र येऊन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देशी वाण बीज बँकेची स्थापना केली आहे. आत्तापर्यंत 50 च्या वर देशी वाणांचीची जोपासना आणि संवर्धन करण्यात आले असून या बियांना मोठी मागणीही प्राप्त होत आहे. याचा विचार करून गावातील 30 गुंठे जागा महिलांनी भाडेतत्त्वावर घेऊन आज त्या जागेत देशी वाण बियांचे टोकन केले.
शेडशाळ येथील महिलांनी देशी वाण बियांच्या संगोपन व संवर्धनाचे करत असलेले काम हे मानवी जीवनासाठी, मानवी आरोग्यासाठी आवश्यक आहे. देशी वाण बीज संगोपनाची महिलांची ही चळवळ आगामी काळात मोठे रूप घेऊ शकते. या महिलांच्या कामाला शुभेच्छा देऊन त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यास आपण तयार असल्याचे प्रांताधिकारी मोसंबी चौगुले बर्डे यांनी सांगितले.
उद्यानपंडित गणपतराव पाटील, तसेच शमा पठाण व इतर महिलांनी बीज बँके संदर्भातील सुरू असलेल्या कामाची विस्तृत माहिती प्रांताधिकार्यांना दिली. त्यानंतर बीज बँकेला सर्व मान्यवरांनी भेट देऊन बीज बँकेचे काम कसे चालते याची माहिती समजावून घेतली. सर्व मान्यवरांचा व डॉक्टरांचा सत्कार बीज बँकेच्या महिलांनी केला. यावेळी कारखान्याचे संचालक भैय्यासो पाटील, दरगू गावडे, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, गजानन चौगुले, ज्योतीकुमार पाटील, सरपंच किरण संकपाळ, उपसरपंच भारतीय लाड, तलाठी एस. एस. भानुसे, कैलास लाड, शरद पवार, सुनील संकपाळ, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, रावसाहेब चौगुले, अशोक शिरढोणे, अमोल पाटील, सुरेश केरीपाळे, डॉ. महावीर मुळे, डॉ. झाकीरहुसेन पटेल, डॉ. मोहन पाटील, डॉ. अनिल चौगुले, डॉ. बाळासो देवताळे, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, माती परीक्षक ए. एस. पाटील, सुदर्शन तकडे, यांच्यासह बीज बँकेच्या महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.