सदाबहार दोस्ती ग्रुपच स्वच्छ गाव सुंदर गावला पुढाकार



प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

सारडे विकास मंच तर्फे कोमनादेवी ऑक्सिजन पार्क ची निर्मिती करण्यात आली आणि निसर्गाचं रूप च बदलून टाकल गेली 10 वर्ष हे प्रयत्न चालू आहेत आणि आता असंख्य निसर्गप्रेमी या पर्यटन केंद्रास भेट देऊ लागले आहेत.

 या साठी अनेक निसर्गप्रेमी च सहकार्य लाभल आहे. परतू हे निसर्ग सुंदर आणि स्वच्छ राहिला पाहिजे यासाठी सदाबहार दोस्ती ग्रुप तर्फे  कामेश्वर म्हात्रे,हरीश म्हात्रे,अरुण म्हात्रे,सचिन पाटील,तुकाराम गावंड , संतोष जोशी, विजय गावंड, जितेंद्र म्हात्रे,कैलास पाटील,भार्गव पाटील यांच्या सहकार्याने कोमनादेवी ऑक्सिजन पार्क सारडे येथे पाच कचरा पेट्या बसविण्यात आल्या जेणे करून पर्यटक आपली कचरा योग्य जागी विसर्जित करू शकतो.

 यासाठी परेश ठाकुर साहेब,नित्यानंद म्हात्रे साहेब याच्या सहकार्याने आणि सदाबहार दोस्ती ग्रुप च्या सर्व सदस्या मार्फत सुंदर अशी भेट या ऑक्सिजन पार्क साठी देण्यात आली खास करून सदाबहार दोस्ती ग्रुप च्या सर्व सदस्या चे कोमनादेवी ऑक्सिजन पार्क ,सारडे विकास मंच ,आणि ग्रामस्थ तसेच नागेंद्र म्हात्रे याच्या वतीने राज्यशासन आदर्श शिक्षक   श्री विद्याधर पाटील सर  यांनी आभार व्यक्त केलं भविष्यात येणाऱ्या पर्यटकांना देखील विनंती त्यांनी केली की  आपण या ऑक्सिजन पार्क ला नक्की भेट द्या परंतु सोबत आणलेले कचरा या  कचरा कुंडीत टाका जेणे करून स्वच्छ निसर्ग आपणास पहात यावा, सर्वांनी निसर्गाचं रक्षण करू या ही काळाची गरज आहे असा संदेश अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी दिला

Post a Comment

Previous Post Next Post