प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
--जिल्हाधिकारी अलिबाग (जिमाका) :- इर्शाळगड वाडीच्या दुर्घटनाग्रस्त आदिवासी पाड्यावर बचाव व मदत कार्यासाठी शासन यंत्रणा संपूर्ण प्रयत्नशील असून येथे मदत कामासाठी कार्यरत असलेल्या शासन यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी व बचाव मदत कार्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त इतर कोणालाही तेथे प्रवेश देण्यात येणार नाही असे जिल्हाधिकारी रायगड -अलिबाग डॉ योगेश म्हसे यांनी कळविले आहे.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सलग दोन दिवस बचाव कार्य व मदत कार्य सुरू असून भर पाऊस असतांना देखील यंत्रणा अविरत कार्यरत आहे. अनावश्यक गर्दीमुळे येथील मदत कार्य प्रभावित होऊ शकते. या अनुषंगाने उद्या तिसऱ्या दिवशी 22 जुलै 2023 रोजी पासून इसराळगड , नमराची वाडी येथील दुर्घटनास्थळी व बेस कॅम्प परिसरात अनावश्यक गर्दी टाळावी.ज्यांची अधिकृतपणे शासकीय यंत्रणा कडून नेमणूक झाली आहे. त्यांनीच केवळ येथे उपस्थित रहावे.
ज्यामुळे प्रत्यक्ष मनुष्यबळासाठी व दुर्घटनेतील वाचलेल्या नागरीकांसाठी घटना स्थळावर तातडीने विना अडथळा बचाव व मदतकार्य मोहीम राबवता येईल, असे डॉ. म्हसे यांनी स्पष्ट केले आहे.