स्थानिक गुन्हे शाखेने दोन कुख्यात अट्टल गुन्हेगारांना एक पिस्तल व दोन जिवंत काडतूस सह रसायनी पोलीस ठाणे हद्दीतून घेतले ताब्यात"



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड अलिबाग नेमणुकीतील पोलीस हवालदार संदीप पाटील यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, रसायनी- मोहपाडा सी.बी. रोड या ठिकाणी दोन संशईत इसम जीन्स पॅन्ट व टि शर्ट घातलेले दोघांना दाढी असलेले असे वर्णनाचे इसम हे संशईत रित्या देशी पिस्तल घेवून आले आहेत व ते सदर परिसरात फिरत आहेत. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा बाळासाहेब खाडे यांनी सदर गोपनीय माहिती प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक, संजीव पाटील, पोलीस हवालदार/ राजेश पाटील, पोलीस हवालदार संदीप पाटील, पोलीस हवालदार सुधीर मोरे, पोलीस हवालदार प्रतीक सावंत, पोलीस हवालदार यशवंत झेमसे, पोलीस हवालदार राकेश म्हात्रे यांची टिम गठीत करून तात्काळ सदर परिसरात पथक रवाना केले. मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर पथकाने संशईत इसमांना सापळा रचून शितापिने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांचे नावे 1) सन बाबु पनीकर वय 32, रा. प्रवीण जनरल स्टोअर्स अ-1, घाटला आचार्य कॉलेज समोर, चेंबुर 400071, 2) गणेश आनंद भंडारी वय 32, रा. रूम नं. 304, अयप्पा मंदीर तीर्थ व्दारका बिल्डींग, पनवेल, असे असुन त्यांची त्याजागी अंगझडती घेतली असता एक गावठी बनावटीचा कट्टा (पिस्तल) व दोन जिवंत काडतूस त्यांचेकडे मिळून आले. सदरची कारवाई पंचासमक्ष करून त्यांना पुढील तपासाकरिता ताब्यात घेतले आहे. सदर बाबत रसायनी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.


सदर आरोपीत यांची सीसीटीएनएस प्रणाली मध्ये यापुर्वीचा गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता त्याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

आरोपीत याचेवर पुर्वी दाखल गुन्हे:- 1) सन बाबु पनीकर:-

1. पंतनगर पोलीस ठाणे गु.र.नं. 368/2014 भादविक 454,457,380,34 2. पंतनगर पोलीस ठाणे गु.र.नं. 393 / 2014 भादविक 302,326,324 वगैरे 3. डी. सी. बी. सीआयडी कुर्ला पोलीस ठाणे गु.र.नं. 85/2015 भादविक

454,457,411,34 4. कोपरी पोलीस ठाणे गु.र.नं. 1105/2015 भादविक 454,457, 380,

5. नेहरूनगर पोलीस ठाणे गु.र.नं. 122/2015 भादविक 454,457,411 6. पंतनगर पोलीस ठाणे गु.र.नं. 321/2014 भादविक 454,457,380,411 7. कोपरी पोलीस ठाणे गु.र.नं. 1117/2015 भादविक 454,380,34 8. पंतनगर पोलीस ठाणे गु.र.नं. 261/2015 भादविक 454,457, 380,34

Post a Comment

Previous Post Next Post