प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्री क्षेत्र पंचायत मंदिर सभागृहामध्ये दुर्घटनाग्रस्त बांधवांचे सांत्वन आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेब, विधान परिषदेच्या सभापती सौ. नीलमताई गोऱ्हे, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल आल्या होत्या .त्यांनी व्यक्तिशः दुर्घटनाग्रस्त बांधवांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या आणि त्यांच्या भविष्यातील आवश्यक त्या गरजा जाणून घेतल्या.
यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते श्री. अंबादास दानवे, इतर सन्माननीय खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.