प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
सारडे विकास मंच चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे याच्या वाढदिवसाच औचीत्य साधत साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोप्रोली आयोजित 4 लाईफ कंपनी तर्फे चिरनेर आदिवासी वाडी वर सावा वॉटर प्युरिफायर कॅन च वाटप करण्यात आले,
पाण्यापासुन होणारे आजार आदिवासी बाधवाना होऊ नये आणि त्यांना शुद्ध पाणी मिळावा यासाठी प्रत्येक घरात म्हणजे 60 कुटुंबातील महिलांना हे कॅन वाटप करण्यात आले जार कसे वापरावे त्याचे फायदे काय आहेत हे संतोष खंडागळे ,तसेच जयश्री खंडागळे यांनी आदिवासी महिलांना समजाऊन सांगितले कार्यक्रमासाठी राकेश पाटील, रुपाली म्हात्रे ,त्रिजन पाटील,सिद्धार्थ ठाकूर, जयेश म्हात्रे,सचिन पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेखा अंकुश कातकरी आदीत्य ठाकुर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजना भोईर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सन्नी बोरसे सर यांनी केलं भविष्यात सारडे विकास मंच अनेक सामाजिक शैक्षणिक कार्ये त्याच्या हातून घडो आशा शुभेच्छा शेवटी सर्वांनी नागेंद्र म्हात्रे याना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या