प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
पनवेल : प्रितम म्हात्रे यांच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्री क्षेत्र पंचायतन मंदिर सभागृहा मध्ये आज पासून इर्शाळवाडी येथील बांधवांना राहण्याची आणि अन्नसेवेची व्यवस्था आज दुपारपासून करण्यात आली आहे.
खालापूर तालुक्यातील चौक इरशाळ गडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली असून युद्ध पातळीवर एन.डी.आर.एफ टीम, प्रशासन, सामाजिक संस्था तसेच स्थानिक नागरिक यांच्या कडून बचाव व मदत कार्य सुरु आहे. अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. अंधार आणि पाऊसही असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे येत आहेत.
शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदत कार्यात सक्रिय आहेत. जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून प्रशासनाला मदतकार्यात आवश्यक मदत करीत आहे. माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी या ठिकाणी भेट देऊन मदत केली. या ठिकाणी मदतकार्य करणारे एन.डी.आर.एफ टीम, पोलीस बांधवांना तसेच सामाजिक सेवकांना श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नढाळ येथे अन्नसेवा आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.प्रितम म्हात्रे यांच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्री क्षेत्र पंचायतन मंदिर सभागृहा मध्ये आज पासून इर्शाळवाडी येथील बांधवांना राहण्याची आणि अन्नसेवेची व्यवस्था आज दुपारपासून करण्यात आली आहे. तसेच मदत कार्य करणाऱ्या सेवकांना कुठलीही मदतीची आवश्यकता असेल तर त्यांनी 8334050505, 8796639665 क्रमांकावर संपर्क साधावे असे आवाहन माजी विरोधी पक्षेनेते प्रीतम म्हात्रे यानी केले आहे..