गायीला न्याय आई वर अन्याय करणाऱ्या षंढ व्यवस्थेचा धिक्कार ..वैशाली कोळी (आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्षा)

 सामाजिक विषमता ही जात,धर्म आणि लिंग या तीन घटकावर आधारित असंवेदनशील सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही ..  आप नेते रियाज पठाण


प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

पारंपारिक, प्रतिगामी मानसिकतेचि निंदनीय घटना मणिपूर येथे घडली. अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा मिळावा यावरून ३ मे रोजी मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी समुदायात हिंसाचार उफाळला पोलीस  घेऊन पोलीस ठाण्याच्या दिशेनं जात असताना सुमारे ८०० ते १००० जणांच्या संतप्त जमावाने अन्याय सहन करणाऱ्या   महिलांना पोलिसांच्या ताब्यातून हिसकावून घेतलं. ४ मे रोजी जमावाने या दोन पीडित महिलांना नग्न करत धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचाही आरोप आहे. सदर गुन्ह्याची१८ मे रोजी  एफआयआर दाखल झाली. त्याचदिवशी जमावाने पीडित महिलेच्या १९ वर्षीय भावाची  हत्या केली .

सोशल व प्रसार माध्यमाच्या प्रतिक्रिया पाहता  पोलिस प्रशासना कडून फक्त नामधारी 1 आरोपी अटक केल्याने देश भरात  राजकीय, सामजिक क्षेत्रातुन निषेध व्यक्त केला जात असल्याने मोदी सरकार च्या नेतृत्वाखाली शेकडो  स्त्रियांवरील  अन्याय  अपमान निंदनीय प्रकार असल्याने सरकारच मोठं अपयश  असल्याचे बोलले जाते.

पंतप्रधान व महिला बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांचा असंवेदनशीलपणा, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन यांची सरकार कुठलीही ठोस कार्यवाही करत नाही ,देशात भाजपाचे नेते मंत्री सोडून कुणीही सुखी नाही, अशा सरकारला पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही.

मणिपूरच्या हिंसाचारा संदर्भात आम आदमी पार्टीने राज्यात सर्व जिल्ह्यात तीव्र निदर्शने केली आहेत, केंद्र भाजपा सरकारने लवकरच मणिपूरची परिस्थीती नियंत्रणात आणावी आणि तेथील जनतेला भयापासून मुक्तता द्यावी. तसेच महिलांवरील अत्याचारांची तात्काळ चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून दोषींना कडक शिक्षा करावी अशी मागणी रायगड जिल्हा आम आदमी पार्टी तर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post