प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
श्री नंदाई प्रतिष्ठान, वशेणी तर्फे सारडे विकास मंचचे अध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे ह्यांचा वाढदिवस श्री नंदाई प्रतिष्ठान, वशेणी तर्फे आज रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वशेणी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले .
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन सौ अनामिका म्हात्रे सरपंच ग्रामपंचायत वशेणी, प्रसाद पाटील माजी सरपंच,डॉक्टर विश्राम गोधळी, केंद्रप्रमुखा सौ उर्मिला म्हात्रे,शाळेचे मुख्याध्यापक संदीप गावंड शिक्षक शालेय व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षा सौ कवीता म्हात्रे कार्यक्रमाचे आयोजक श्री नंदाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉक्टर हिराचंद पाटील, श्री त्रिजन पाटील उपस्थित होते . श्री नागेंद्र म्हात्रे याना शाळेचे मुख्याध्यापक संदीप गावंड यांनी संगीतमय शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री रमेश घरत सर यांनी केलं तर श्री निलेश पाटील यांनी आभार प्रदर्शन यांनी यावेळी मान्यवर सौ अनामिका म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात शिक्षणात प्रावीण्य संपादन करून मोठे झाल्यावर श्री नागेंद्र म्हात्रे प्रमाणे समाज्याची सेवा करा तर माजी सरपंच श्री प्रसाद पाटील यांनी शिक्षणा सोबत निसर्गाचं संवरधन करणं काळाची गरज आहे,आणि यासाठी अपान प्रयत्न करू या आसं मत व्यक्त केले,तर केंद्र प्रमुखा सौ. उर्मिला म्हात्रे मॅडम यांनी श्री नागेंद्र म्हात्रे याच्या कार्याचा अहवाल सादर केला, श्री नंदाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉक्टर हिराचंद पाटील यांनी सर्व मान्यवर आणि शालेय व्यवस्थापन कमिटी तसेच शिक्षक वर्ग हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली त्याबद्दल त्याचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला