प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
पनवेल : जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्री क्षेत्र पंचायत मंदिर, नढाळ येथे इर्शालवाडी दुर्घटनाग्रस्त बांधवांचे सांत्वन आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले आले होते. त्यांनी तेथील बांधवांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्याशी चर्चा करून दरडग्रस्त बांधवांच्या पुनर्वसनाबाबत माहिती घेतली. तसेच आमदार दौलत दरोडा, अभिनेते सुशांत शेलार, अभिनेत्री आदिती सारंगधर व अन्य मान्यवर दुर्घटनाग्रस्त बांधवांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. इर्शालवाडी दरडग्रस्त नागरिकांना जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्री क्षेत्र पंचायतन मंदिरात ठेवण्यात आले होते. या वेळी त्यानी माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचे करत असलेल्या सेवेबद्दल कौतुक केले.