खालापूर नागरिक शेतक-यांच्या पाठपुराव्याला यश . मांगूर पालन करणा-या विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल .
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
तालुक्यात बेकायदा सुरू असलेल्या मांगुर मत्स्य पालन विरोधात खालापूरमधील ग्रामस्थ, शेतकरी शिवलिंग वाघरे,सातत्याने वृत्तपत्रातून वाचा फोडणारे पत्रकार मनोज कळमकर यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. मत्स्य विभाग रायगड यांनी धडक तपासणी मोहीम सुरू केली असून सोमवारी खालापूर तालुक्यातील महड ,धामणी परिसरात तलावावर कारवाई केली आहे.
सहाय्यक मत्स्य आयुक्त रायगड विभाग संजय पाटील, उपयुक्त चेतन निवलकर, सोनल तोडणकर, खोपोली सहाय्यक मत्स्य विभाग अधिकारी अजया भाटकर ,पाटबंधारे विभागाचे भरत गुंटूरकर, मंडळ अधिकारी संदेश पानसरे खालापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी निलेश कांबळे, हेमा कराळे,अक्षय अतिग्रे,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ क्षेत्र अधिकारी उत्तम माने, , अभिजित तेली , आरोग्य निरीक्षक खोपोली नगरपालिका,विशाल गोयल तक्रारदार शिवलिंग वाघरे, यांच्यासह मोठा फौजफाटा कारवाई दरम्यान उपस्थित होता.
पाताळगंगा नदि लगत हे तलाव असून मोठ्या प्रमाणात मुंगूर माशाची पैदास केली जाते. नदिकिनारी असलेल्या या तलावातील पाणी गटारातील पाण्यापेक्षा घाण आणि दुर्गंधीयुक्त आहे.सडलेले खाद्य मुंगूर माशाना खायला दिले जाते.दुर्गंधीने सर्व परिसर भरून जातो.तलावातील घाण पाणी नदिपाञात सोडली जात असल्याने पाताळगंगा प्रदूषित होत आहे. तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विरोध वाढल्याने त्याची दखल सहाय्यक मत्स्य आयुक्त रायगड संजय पाटील यांनी घेतली. या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे